पुरस्कारश्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या १६ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बाळ दिवाळी अंक म्हणून पुरस्कार मिळाला.

पुण्याच्या दिनमार्क पब्लिकेशन्सने यंदा प्रथमच घेतलेल्या छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेत आपल्या 'वयम्' दिवाळी अंकाला कै. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक- प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

साप्ताहिक उल्हास प्रभात आणि आरोग्य होमिओपॅथिक फार्मसी आयोजित राज्यस्तरीय दिवाळी विशेषांक स्पर्धा २०१४ चा ‘सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक ’ ‘वयम्’ला प्राप्त झाला.


'साहित्य विचार मंथन कल्याण' संस्थेचा उत्कृष्ट दिवाळी अंक २०१४ चा पुरस्कार वयम् ' ला मिळाला. पुरस्कार 'स्वीकारताना 'वयम्' उपसंपादक क्रांती गोडबोले-पाटील.'वयम्'ची दिवाळी पुरस्कारात हॅटट्रिक !!!

को.म.सा.प कल्याण व समर्थ अॅडव्हटाय्रझर्स यांच्या तर्फे 'वयम्' दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट

सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेत "वयम्" च्या दिवाळी अंकास तृतीय क्रमांक मिळाला आहे. दिवाळी अंक जाहीर झाला आहे.

'वयम्' दिवाळी अंक आणखीन एका पुरस्काराचा मानकरी

मराठी वृत्तपत्र लेखक संघ (दादर ) मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेत 'उल्लेखनीय' अंक म्हणून 'वयम्' ला पुरस्कार देताना डॉ. सदानंद मोरे व पुरस्कार स्वीकारताना वयम् चे राजेंद्र गोसावी.